मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरांवर गुन्हा

0 41

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकी दरम्यान आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेने देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोकसभा निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने मिलिंद देवरा यांना नोटीस पाठविली होती. शिवसेनेच्यावतीने अ‍ॅड.धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि कलम १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More