मांडेदुर्गातील रामचंद्र पवार यांची भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षक पदी निवड…

1 17

चंदगड (प्रतिनिधी) : मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील रामचंद्र पवार यांची भारतीय ज्युनिअर  महिला कुस्ती टिमच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.  त्यांची ऑगस्ट महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धा आणि इस्टोनिया (युरोप) येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून ते मार्गदर्शन करणार आहेत.

या आधी पवार यांनी युवा ऑलंपिक स्पर्धा (अर्जेटिना), तसेच  आशियाई व जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून यशस्वी काम केले आहे. पवार हे कोल्हापूर शाहू केसरी पदकाचे मानकरी असून अत्यंत चपळ कुस्तीगिर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चंदगड सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातून प्रशिक्षक म्हणून काम करणारी ती पहिलीच व्यक्ती आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. Santoshkamble says

    अभिनंदन सर

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More