मराठा विद्यार्थ्यांना दिलासा : हायकोर्टाने फेटाळली वैद्यकीय प्रवेशाच्या आरक्षणविरोधातील याचिका

0 100

मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय प्रवेशासाठी या वर्षापासूनच मराठा आरक्षण कायदा लागू करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने आज (गुरुवार) फेटाळून लावली. यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमबीबीएस प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी आरक्षण कायदा लागू करण्यास विरोध करणारी याचिका आज कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र एसबीई अंतर्गत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. ‘प्रवेशप्रक्रिया आधी सुरू झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते’, हा राज्य सरकारचा दावा स्वीकारत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू होणार आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More