मनपाडळे येथे विहिरीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

0 43

पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे एका विहिरीत दोरीने हात पाय बांधून टाकलेल्या अवस्थेत अनोळखी युवकाचा मृतदेह आज (बुधवार) सायंकाळच्या सुमारास आढळून आला. त्याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला असण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

Krushi Pradarshan

मनपाडळे गावच्या हद्दीत तानाजी पाटील यांची विहीर आहे. या विहिरीत हा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पो. नि. प्रदीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने  मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. हा खून कोणत्या कारणावरून झाला. मृतदेह कोणाचा याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून २५ ते ३० वया दरम्यान या युवकाचे वय असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. मृतदेहाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह सीपीआर रूग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More