मद्यधुंद गुन्हेगाराचा सायबर चौकात धुडगूस : नागरिकांकडून बेदम मारहाण

0 336

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या घरात घुसून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नागरिकांनी बेदम मारहाण केली. शुभम उर्फ चिन्या अजित हळदणकर (वय २०, रा. दौलतनगर) असे त्याचे नाव असून राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सायबर चौकात रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याबाबत नंदा राजेंद्र गोंगाणे (वय ३०, रा. सायबर चौक) यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा गोंगाणे यांचे राजारामपुरी परिसरातील सायबर चौकात किराणा दुकान आहे. रविवारी रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत चिन्या हळदणकर हा दुकानात खरेदीसाठी आला. दुकानात खरेदी करताना त्याने रोडवरील अज्ञात लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गोंगाणे यांनी त्याला शिविगाळ करू नकोस असे बजावले. या रागातून त्याने खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे दिले नाही, उलट दुकानातील साहित्य, दारातील कुंड्यांची नासधूस केली. याचबरोबर गोंगाणे यांना मारहाण केली. त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याची नासधूस केली.

एवढ्यावरच न थांबता त्याने दुकाना शेजारी राहणाऱ्या संजय निकम यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून घरात घुसून, निकम यांच्या पत्नी आणि मुलीशी लज्जास्पद वर्तन केले. यामुळे संतापलेल्या  हळदणकर याला परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण करून राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. हळदणकर याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More