भारताला इस्रायलकडून मिळाले घातक बाँब..!

0 60

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलने ‘स्पाइस २००० बॉम्ब’ भारतीय हवाईदलाला सुपूर्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताच्या हवाईदलाचे सामर्थ्य वाढले आहे. अत्याधुनिक ‘बिल्डींग ब्लास्टर’ प्रकारातील हे बॉम्ब आहेत. भारत – पाकिस्तानमध्ये वाढता तणाव पाहता या बॉम्बमुळे भारतीय हवाईदलाची शक्ती अनेक पटींने वाढणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होणार आहे.

इस्रायलमधील कंपनीबरोबर मार्क ८४ या कंपनीबरोबर भारताने २५० कोटींचा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतीय हवाईदल अत्याधुनिक बॉम्ब विकत घेणार आहे. याच ‘स्पाइस २००० बॉम्ब’ची पहिली तुकडी नुकतीच भारताला ग्वाल्हेर येथील हवाईदलाच्या तळावर सुपूर्द करण्यात आली. हे बॉम्ब केवळ मिराज २००० या लढाऊ विमानांमध्ये वापरता येणार आहे. हे बॉम्ब इतके शक्तीशाली आहेत की ते संपूर्ण इमारत अगदी काही क्षणांमध्ये उद्धवस्त करु शकतात.

मार्क ८४ या इस्रायलमधील कंपनीबरोबर जून महिन्यात झालेल्या करारानुसार भारत १०० ‘स्पाइस २००० बॉम्ब’ विकत घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संरक्षण खात्यासाठी तत्काळ खरेदी करण्याच्या उद्देशाने जारी केलेल्या अतिरिक्त निधीमधून हा करार झाल्याचे समजते. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील निर्मिती असणाऱ्या ‘स्पाइस २००० बॉम्ब’चा यशस्वीपणे वापर करण्यात आला. आता याच बॉम्बच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करुन तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वरुपाचे बॉम्ब भारताने खरेदी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More