बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षाची शिक्षा

0 15

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेजारी राहणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या कणेरीवाडी (ता.करवीर) येथील पांडुरंग पाटील (वय : ४२) या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी १० वर्ष सक्त मजुरी २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारच्यावतीने अॅड. अमिता कुलकर्णी यांनी काम पहिले.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, २०१३ साली पांडुरंग मारुती पाटील याने कणेरीवाडी (ता. करवीर) येथील आपल्या घराजवळ राहणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेला घरात बोलवून तिच्या लहान वयाचा आणि अज्ञानाचा फायदा घेवून बलात्कार केला. याबाबत पिडीत बालिकेच्या आईने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्याचा तपास स.पो.नि.डी.जी.पिसाळ, कॉ. वर्षा पाटील, कॉ. वनिता चव्हाण यांनी केला.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्यासमोर चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षातर्फे पिडीत मुलीसह सात साक्षीदार तपासले. या सर्वांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. याबरोबरच अॅड. अमिता कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी पांडुरंग पाटील यास १० वर्ष सक्त मजुरी आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावला आहे.     

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More