‘बाहुबलीफेम’ राजामौलीच्या चित्रपटात अजय देवगण आणि आलीया

0 10

मुंबई (वृत्तसंस्था) बाहुबली या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आता एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणार आहेत. आलिया भट आणि अजय देवगण या चित्रपटात एक खास भूमिका साकारताना दिसेल. अल्लुरी सीताराम आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्यसैनिकांवर हा चित्रपट आधारित आहे.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

अल्लुरी सीतारामच्या भूमिकेसाठी राजामौली यांनी राम चरण या दाक्षिणात्य अभिनेत्याची निवड केली असून ज्युनिअर एनटीआर हा कोमाराम भीमच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच ४० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं उर्वरित चित्रीकरण पुणे, हैदराबाद आणि गुजरात येथे होणार आहे. या चित्रीकरणात आलियाच्या भूमिकेचा समावेश असणार आहे. आलियाची भूमिका एका २० वर्षांच्या मुलीची आहे. कथानक १९ व्या आणि २० व्या शतकातलं असल्यामुळे तिला तसा लूकही देण्यात येणार आहे. अजय देवगणही या चित्रपटात राम चरण या अभिनेत्याच्या पित्याच्या भूमिकेत दिसेल.

या चित्रपटाच बजेटही तगड आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी अनुक्रमे १५ आणि २५  कोटी इतक मानधन निश्चित केल आहे. एकंदरीतच हा चित्रपट बाहुबलीसारखाच एक बिग बजेट पिरिअड ड्रामा असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More