प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम् रुग्णालयात…

0 12

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना छातीत दुखत असल्याने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात आज (सोमवार) दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना २००४ साली देखील युवा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मणिरत्नम हे दक्षिणेतील दिग्गज चित्रपटनिर्माते आहेत. त्यांनी हिंदी मध्येही बॉम्बे, दिल से, रावण, रोजा, युवा, गुरु ही हे नामांकित चित्रपटही दिले आहेत. मणिरत्नम यांना हृदयाशी संबंधित तक्रार असल्याने ग्रीम्स रोड येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेऊन आहे.

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी काहीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More