प्रतीक्षा संपली ! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

0 12

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबतची उत्सुकता आता संपली आहे. उद्या म्हणजे मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वा. जाहीर होणार आहे. अद्याप मंडळाने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही, तरीही हा निकाल उद्याच लागणार असल्याचे वृत्त आहे.  mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. यंदा नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. सीबीएसईचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे हा निकाल अधिक चांगला लागेल, अशी शक्यता शैक्षणिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More