पोलीसांसह कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर संपन्न…

0 8

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय शिबीराचे आज (शनिवार) आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धीविनायक हार्ट हॉस्पिटल आणि शाहुवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर.आर.पाटील यांच्या वतीने या शिबीराचा आयोजन केले होते.

शाहुवाडी उपविभागीय कार्यक्षेत्रातील शाहुवाडी, कोडोली,पन्हाळा, राधानगरी, कळे, गगनबावडा या पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह ६२ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन सिद्धीविनायक हार्ट हॉस्पिटलचे डॉ. चंद्रकांत पाटील, ह्दयरोग तज्ञ डॉ. मनिषा पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.

शिबीरात प्राथमिक शारिरीक तपासणी, शुगर, रक्तदाब, ईसीजी तसेच ह्दयाशी संबंधीत तपासण्या करण्यात आल्या. त्यांना औषधेही देण्यात आली. यावेळी पतंजली विद्यापीठीच्या कोल्हापूर शाखेचे जेष्ठ योगगुरु श्री पुरोहीत यांनी ‘योगा व ध्यानधारणा’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी ‘पोलीसांचे आरोग्य व दैनंदिन जीवनशैली’ व ह्दयासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. सौ. मनिषा पाटील यांनी ‘आहार व आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पन्हाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More