निवडणूक आयोगाने फेटाळली सर्व व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी

0 15

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी. तसेच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदार संघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने आज (बुधवार) फेटाळून लावली आहे.

जिथे शक्य आहे त्या मतदान केंद्रांवर ईव्हीएमच्या आधी व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी व्हावी अशी मागणी २२ विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने केली होती. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी करावी असं त्यांनी मागणीत म्हटलं होतं. पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.

विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी करताना सांगितलं की, ‘व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही विसंगती आढळली तर सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी’.काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक सिंघवी यांनी आयोगासमोर विरोधकांची बाजू मांडली होती. विरोधकांनी निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांचा विचार करु असे सांगितले असल्याची माहिती दिली होती. परंतु यावेळी भाजपाने विरोधक पराभवाच्या भीतीने हे सर्व करत असल्याचा टोला लगावला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More