नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस ; श्री अंबाबाई गजारूढ रुपात पूजा (फोटो)

0 116

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या (गुरुवार) पाचव्या दिवशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रुपात  पूजा बांधण्यात आली आहे. कामाक्ष राक्षसाचा वध करून करवीर नगरीच्या पूर्वेला रुसून बसलेल्या श्री त्र्यंबुली देवीचा रुसवा काढायला देवी लवाजम्यासह गजारूढ होऊन निघते. याचेच प्रतिक म्हणून अंबाबाईची गजारूढ पूजा बांधण्यात आली आहे.

गजारूढ श्री अंबाबाई

श्रीमहालक्ष्मीच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमी. आजच्या दिवशी देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. कारण या दिवशी देवी तिच्या प्रियसखी त्र्यंबुली देवीच्या भेटीसाठी निघते. कामाक्ष वध करून करवीराच्या पूर्वेला रुसून बसलेल्या त्र्यंबुलीचा रुसवा काढायला देवी लवाजम्यासह निघते. कोल्हासुर वधाचे प्रतिक म्हणून तिच्या दारात कोहाळ्याचा भेद केला जातो. प्रत्यक्ष देवी महालक्ष्मीच्या वचनानुसार श्री अंबाबाई समस्त देव, ऋषी, त्यांचे परिवार, श्री त्र्यंबुली देवीच्या दर्शनाकरिता निघालेल्या स्वरूपात आजची पूजा बांधली जाते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More