‘तेजस्विनी’ने साकारली ‘महापुरातली अंबाबाई’ आणि ‘कामाख्या..!

0 248

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये दुर्गेची नऊ रूपे साकारली होती. यंदाच्या वर्षीही तिने अशी रूपे साकारून त्याचे फोटो शेअर केले आहेत. नवरात्रीच्या सुरुवातीलाच तेजस्विनीने करवीरनिवासिनी अंबाबाईचा फोटो शेअर केला आहे.

कोल्हापूरला यंदा महापुराचा फटका बसला होता. त्यामुळे तिने ‘महापुरात अवतरलेली अंबाबाई’ असे रूप साकारले.

याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहात जाताना पाहत होते मी…पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्प्याटप्प्याने छाटलेस तू… कधी मोठ्या रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्ती व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्रीने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला…
पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार…
मी बहरायचं नाही सोडणार
मी बहरायचं नाही सोडणार

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तेजस्विनीने ‘कामाख्या’ चे रूप साकारले आहे.

वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश… प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात, स्त्री प्रमाणे नदीही रजस्वला संस्कारानंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अशाप्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०, ००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात. हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेव्हा त्यासाठी कुणाला जबाबदार ठरवू मी ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More