डोकलामपर्यंतचा रस्ता पूर्ण ; अत्यल्प वेळेत पोहचणार लष्कर…!

0 47

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येणाऱ्या डोकलाम भागापर्यंत पोहोचण्यासाठी आता भारतीय लष्कराला अवघे ४० मिनिट लागणार आहे. कारण सीमा रस्ते संघटनेने भीम बेस ते डोकलाम बेसपर्यंत पोहचणारा रस्ता बनला आहे. त्यामुळे भारतीय लष्करांना शत्रूराष्ट्रांना कमी वेळेत प्रत्युत्तर देण्यासाठी हा रस्ता उपयोगी ठरणार आहे.

याआधी लष्काराला येथे पोहोचण्यासाठी तब्बल ७ तास लागत होते. परंतु २०१७ मध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ रस्त्यांचे जाळे वाढवण्याचे निर्देश दिले होते.

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भीम बेस डोकलामपर्यंत रस्त्याचे जाळे पोहोचल्याने लष्कराला हत्यांरांची ने-आण करण्यासाठी खूपच कमी वेळ लागणार आहे. बीआरओने आतापर्यंत भारत- चीन सीमेवर ३३४६ किलोमीटर लांबीच्या ६१ रस्त्यांची निर्मिती केली आहे. बीआरओ २०१९ मध्ये चीन सिमेवर आणखी ११ रस्त्यांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे चीनने भारताच्या सुरक्षेला आणि आत्मसन्मानाला धोका पोहचवण्याचे कोणतेही चुकीचे पाऊल उचलल्यास त्याची नांगी तात्काळ ठेचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More