ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्याआड..!

0 338

मुंबई (प्रतिनिधी) : कधी खलनायक तर कधी कॉमेडी स्टार बनून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.

‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील विजू यांची ‘कालिया’ची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कोरली गेली आहे. विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्टची भूमिकाही गाजली. ‘गलती से मिश्टेक हो गया’ हा अंदाज अपना अपना या चित्रपटातील त्यांचा संवादही विशेष गाजला.

‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘अदलाबदली’ यासारख्या मराठी चित्रपटात विजू यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. कालिया, गँगस्टर, डाकू, डॉनचा उजवा-डावा हात, विमा एजंट यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More