ग्रामपंचायत कालकुंद्री येथील प्रभाग १ साठी गुरुवारी फेरमतदान

0 19

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कालकुंद्री येथील प्रभाग क्र. १ मध्ये ३ जागांसाठी रविवार दिनांक २३ जून रोजी मतदान घेण्यात आले. या दिवशी मतदान यंत्रात झालेली तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्र. क्र. १ मध्ये फेरमतदान घेण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

आयोगाने २० मे रोजीच्या आदेशातील निवडणूक नोटीस प्रसिध्दी ते निवडणूक चिन्ह वाटपापर्यंतचे सर्व टप्पे कायम ठेवले आहेत. मतदान व मतमोजणीसाठीचा  निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, गुरुवार दि. २७ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान, शुक्रवार २८ रोजी मतमोजणी तर शनिवार २९ रोजी मतमोजणी होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More