गडहिंग्लजमध्ये कंटेनर-कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू

0 33

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रुक जवळील मार्गावर काल (सोमवार) रात्री उशीरा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात हरळी बुद्रुक जवळील इंचनाळ भागात घडली.

सूरज जयवंत तिप्पे (वय २६, रा. तमनाकवाडा, ता. कागल), सूरज भरमा पाटील (वय २२, रा. बेळगाव), विश्वजीत पाटील (वय २२, रा. गोकुळशिरगाव, ता. करवीर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.  संदेश सदाशिव तिप्पे (वय २२, रा. तमनाकवाडा, ता. कागल), कंटेनरचा चालक अजिनाथ खुडे (रा. वडगाव, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. पंधरा दिवसात या मार्गावर तीन अपघात झाले असून यामध्ये ११ बळी गेले आहेत.

सोमवार दि. २९ रोजी रात्री चौघेजण कारमधून (एम एच  ०९ बी एम ८६१९) रात्री नेसरी येथील मित्राच्या घरी जेवायला गेले होते. परत येत असताना हरळी येथील महादेव मंदिरानजीक रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी त्यांनी कार थांबवली. नेसरीकडून येणाऱ्या बाराचाकी कंटेनरने त्यांच्या कारला मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की यावेळी कारचा चक्काचूर झाला. यामध्ये तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील एकजण आणि कंटेनरचालक जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More