गडहिंग्लजमधील अवैध बांधकाम विरोधातील उपोषण तात्पुरते स्थगित…

0 18

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीतील नक्षत्र बिल्डिंगमध्ये होत असलेले अवैध बांधकामा विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. तर सबंधितांच्यावर कारवाई करण्याचे बांधकाम विभागाने पत्र दिले आहे.

नक्षत्र बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी नगरपालिका बांधकाम विभागाकडे या बिल्डिंगमध्ये अवैधरित्या बांधाकाम चालु असल्याची तक्रार केली होती. त्यावर बांधकाम विभागामार्फत कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. याच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला होता. या इमारतीचे अवैधरित्या झालेले बांधाकाम, त्याचे निकृष्ट काम, इमारतीच्या भोवती जागा न सोडणे, ऑडिडची मागणी, पार्किंग समस्या या समस्यांवर  नगरपालिकेने लक्ष घालून  ठेकेदार आणि जागा मालकावर  कारवाई करावी. यासाठी लाक्षणिक उपोषणाला येथील नागरिक बसले होते.

यावेळी बांधकाम विभागाने नक्षत्राच्या विकासकांना नोटीस बजावली असल्याचे सांगत सबंधितांच्यावर कारवाई करण्याचे बाधकाम विभागाने पत्र दिल्यानंतर हे उपोषण नागरिकांनी तात्पुरते स्थगित केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More