क्रॉसड्रेन कामासाठी कोळेकर तिकटीपासूनचा रस्ता बंद…

0 14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रस्त्यावरील पाणी निर्गातीसाठी क्रॉसड्रेन बांधण्याच्या कामाकरिता प्रभाग क्रमांक ४५ (बी वॉर्ड) मधील कोळेकर तिकटी येथील वडगावकर घर ते लेटेस्ट तरुण मंडळ रोडपर्यंत शहरातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तरी ही वाहतूक शुक्रवार दि. १२ ते २६ जुलै या कालावधीत बंद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर  फोन – (०२३१) २६२७५७९)

रस्त्याच्या कामासाठी शहरातील अवजड वाहतूकही बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता बंद असलेल्या कालावधीत मिरजकर तिकटी, प्रायव्हेट हायस्कूल, लाड चौक, नंगिवली चौक या पर्यायी रस्त्याच्या मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More