क्रिकेट क्षेत्रात संभाजीराजेंची एण्ट्री ; ‘एमसीए’च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पदी निवड

0 136

मुंबई (प्रतिनिधी) : खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बोर्ड ऑफ डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक ४ ऑक्टोबरला होणार आहे. याआधीच छत्रपती संभाजीराजे यांची संचालक मंडळाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.

मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ४ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. यात सत्ताधारी बाळ म्हाडदळकर गटाला युनायटेड फॉर चेंज या गटाचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. असे असले तरी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी डॉ. विजय पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अमोल काळे यांचा बिनविरोध निवड होईल असे चित्र आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More