कोल्हापूरच्या ‘ऋणमुक्तेश्वर’ने पटकावला युनायटेड चषक…

0 202

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : अटीतटीचा झालेला अंतिम फुटबॉल सामन्यात कोल्हापूरच्या ऋणमुक्तेश्वर बेळगावच्या केएलई टेनविक फुटबॉल असोसिएशनला एका गोलने नमवून अकरा हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा मान्सून युनायटेड चषक पटकाविला. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले दोन दिवस ही स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर आणि गडहिंग्लज येथील संघ सहभागी झाले होते.

आज झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार आक्रमक खेळ केला. बेळगावचा  मिडलप्लेअर किरण चौकशी आणि कोल्हापूरचा असीब सय्यद बहादार खेळ करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पूर्वार्धात संपण्यास केवळ पाच मिनिटे असताना कोल्हापूरच्या अक्षय गायकवाडने जोरदार फटक्याद्वारे गोल नोंदवून आघाडी घेतली.

सामन्याच्या उत्तरार्धात बेळगावच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी जंगजंग पछाडले. बेळगावचा अभिषेक चेरेकरने मारलेला उत्कृष्ट चेंडू कोल्हापूरच्या गोलपोस्टच्या जवळून गेला. बेळगावच्या खेळाडूंना दिशाहीन फटक्यामुळे अखेरपर्यंत बरोबरी साधता आली नाही. कोल्हापूरचा गोलरक्षक शुभम घराळे, बचावपटू ऋषिकेश पाडळकर, निलेश गायकवाड, अक्षय दळवी यांनी भक्कम बचावफळी ठेवली होती.  

यावेळी कर्मवीर शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसन कुराडे, इंजिनीयर सुनील कुंभार यांच्या हस्ते विजेते,उपविजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रा.कुराडे यांचा युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी युनायटेडचे उपाध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद, संभाजीराव शिवारे, महादेव पाटील, स्पर्धा समन्वयक यासीन नदाफ, ओंकार सुतार उपस्थित होते. प्रशिक्षक दीपक कुपनवार यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More