केंद्राकडून बालाकोट एअर स्ट्राइकचा व्हिडिओ जारी..!

0 225

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी महिन्यात पुलवामामध्ये सीआरपीएफ ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्याचे सडेतोड उत्तर म्हणून भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकचा रोमांचकारी व्हिडिओ भारतीय हवाई दलाने जारी केला आहे. या व्हिडिओत बालाकोट हल्ला कसा केला हे दाखवण्यात आले आहे. हवाईदल दिनानिमित्त दिल्लीमधील एका पत्रकार परिषदेत हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या उपस्थित हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मद प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांच्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरव आले आहे.

यावेळी ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे  सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More