काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा ; तीन जवान जखमी

0 12

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज (सोमवार) सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अद्याप या ठिकाणी चकमक सुरू आहे. शिवाय या भागात आणखी दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता वर्तवली असल्याने परिसरात शोध मोहीम सुरू आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती.  दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्याने चकमकीस सुरूवात झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More