आनंदराज आंबेडकर यांचा दिल्लीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा

0 21

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाला आपला पाठींबा जाहीर केला आहे.रिपब्लिकन सेनेचे दिल्ली प्रमुख राकेश प्रजापती यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाला रिपब्लिकन सेनेचा पाठींबा जाहीर केल्याचे पत्र  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना दिले आहे. तसेच दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

घोंडा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार बी. टी शर्मा आणि दिल्ली प्रदेश पूर्वांचल गण परिषदेचे अध्यक्ष निर्मल पाठक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यांच्या पक्ष प्रवेशामुळे दिल्लीत काँग्रेसची ताकद वाढली असल्याचे शीला दीक्षित यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More