आजरा कारखाना खाजगी तत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

0 12
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजरा सहकारी साखर कारखाना खाजगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव आज (शनिवार) संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला. कारखाना स्थळावर चेअरमन अशोक चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ११ विरुद्ध १०  अशा मतांनी हा ठराव मंजूर झाला. या वेळी विरोधी गटाच्या संचालकांनी आधी चेअरमन अशोक चराटी यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतर सभासद आणि सर्व संचालक जो निर्णय घेतील तो मान्य करावा, अशी मागणी केली.या वेळी अशोक चराटी यांनी सांगितले की, जर सरकारने आपल्या धोरणामध्ये काही बदल करून कारखानदारीस मदत करण्याचे ठरवले तर आम्ही स्वबळावर कारखाना चालवू अन्यथा कारखाना चालविण्यास देणे सभासदांच्या हिताचे आहे, हे लक्षात घेऊनच आम्ही हा ठराव आम्ही केला आहे माझ्या राजीनाम्यानंतर काही शाश्वत धोरणे राबविणार असतील तर राजीनामा देखील देण्यास हरकत नाही. पण तसे काही ठोस नियोजन नसल्याने आम्ही सत्ताधारी संचालकांनी बहुमताने ठराव केला आहे. शासनाच्या धोरणामुळे कारखानदारी अडचणीत असून आगामी हंगामात कारखाना  चालू राहून सभासदांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, असे चराटी यांनी ‘लाईव्ह मराठी’ला सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More