अफगानिस्तानात बॉम्बस्फोट ; ४० जणांचा मृत्यू

0 12

काबूल (वृत्तसंस्था) : अफगानिस्तानातील काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. यात ४० जणांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, जवळ असणाऱ्या इमारतींना हादरा बसला आहे. एका कॉम्प्लेक्समधील कारमध्ये हा स्फोट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात ६३ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा सुरक्षा जवानांचा समावेश असून त्यांच्यातील २० जण जखमी झाले आहेत. यात काही लहान मुलांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉम्बस्फोटानंतर हल्लेखोर जवळच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीत लपले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. आपण सुरक्षा मंत्रालयाच्या तांत्रिक स्थापनेवर हल्ला करत होतो असा दावा केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More