अखेर नितेश राणेंंसह १८ जणांना जामीन मंजूर…

0 22

कणकवली  (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची अंघोळ घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी आ. नितेश राणे यांना ओरोस न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडेसह स्वाभिमान पक्षाच्या १८ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह मिळून अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. तसेच शेडेकर यांना नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने त्यांचा निषेधही केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी आ. नितेश राणे यांना काल अटक केली होती. राणे आणि त्यांच्या सुमारे ५० समर्थकांवर कलम ३५३. ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२० (अ), १४७, १४३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दुपारी ३ वाजता कोर्टात हजर करण्यात आले. अखेर न्यायालयाने त्यांच्यासह इतर १८ आरोपींना जामीन मंजूर केलाय. मात्र त्यांना काही अटीही घातल्या आहेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More