सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडका विशेष सभेत अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी प्नविण माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी जि. प. सदस्य सूभाष सातपूते, कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी संचालक सिताराम पाटील, माजी सरपंच सूर्यकांत दिंडे, भगवान दिंडे, कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष रघूनाथ दिंडे, तंटामूक्त अध्यक्ष मारूतराव दिंडे, आनंदराव दिंडे, ग्रामसेवक आर. आर. भगत, संग्राम बचाटे आदी उपस्थित होते.
गोकुळ, जिल्हा बँकेसह इतर संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा स्थगिती…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सहकार खात्याने आज सायंकाळी त्याबाबतचा आदेश काढला. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ,...
शिरोळच्या पंचायत समितीच्या उपसभापती पदी राजगोंडा पाटील…
शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळच्या पं. स. उपसभापती पदी राजगोंडा पाटील यांची आज (बुधवार) निवड करण्यात आली. ही निवड प्रकिया गटविकास अधिकारी शंकर कवीतगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राजगोंडा पाटील यांचा सत्कार पं. स....
नेत्याच्या ‘उपोषण सांगते’साठी दसरा चौकात एकवटला ‘कागल’चा घाटगे गट…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थनार्थ आज (बुधवार) सायंकाळी दसरा चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांबरोबरच कागल तालुक्यातील...
कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ३३ जणांना कोरोनाची लागण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) दिवसभरात १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात आणखी ३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९७५ जणांचे अहवाल...
विविध गुन्ह्यांंतील दारू परस्पर लाटल्याप्रकरणी फॉरेन्सिक लॅबमधील सहा जणांना अटक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली आणि तपासणी करता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेली दारू याच लॅबमधील दारू बंदी विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर लाटल्याप्रकरणी सात जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात...