आळते येथील रेणुका देवीची यात्रा रद्द

0
347

हातकणंगले (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हातकणंगले तालुक्यातील आळते येथील दि. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणारी रेणुका देवाची यात्रा रद्द करण्याचे आदेश हातकणंगले तहसीलदार यांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास दिले आहेत.

प्रतिवर्षीप्रमाणे होणारी आळते येथील रेणुका देवीची यात्रा भरवण्याबाबत संबंधित प्रशासनाकडून हातकणंगले तहसीलदार यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते. त्या अनुषंगाने यात्रेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता व कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली. याबाबत पत्राद्वारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून स्थानिक प्रशासनास तसे कळविण्यात आले आहे.

दरम्यान, या यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातून हजारो भाविक या ठिकाणी रेणुका देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here