यड्राव ग्रामपंचायत निवडणूक : ४७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
287

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.  यड्राव ग्रामपंचायतीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. गावातील ६ प्रभागासाठी ९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४७ उमेदवारांनी आज (सोमवार) माघार घेतली आहे.

४७ पैकी १३ उमेदवार अपक्ष आहेत. या गावामध्ये सत्ताधारी पॅनल व विरोधी पॅनलमध्ये चुरशीची लढत या गावांमध्ये होणार आहे. प्रभाग ३ मध्ये भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस औरंग शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून भाजपमधील गटबाजी दिसून आली. विरोधी पॅनल सत्ता मिळवण्यासाठी कोणती रणनीती अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here