कोल्हापूर (प्रतिनिधी) :  चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त यशवंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन आणि यशवंत भालकर यांच्या प्रतिमेचे पुजन बाळासाहेब कडोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर नटराजाच्या मुर्तीचे पुजन अभिनेते नितीन कुलकर्णी,  चित्रपट महामंडळचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, कॅमेरामन इम्तीयाज बारगीर, श्रीमती रेखा भालकर आणि संजय भालकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यशाळेत विशेष कोविड योध्दा म्हणून सौ. गौरी प्रमोद संकपाळ यांचा सन्मान करण्यात आला. निशा  शहापुरे आणि मनाली संकपाळ यांनी कथ्थक नृत्य सादर करून यशवंत भालकर यांना अभिवादन केले. अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी चित्रपट अभिनय, नाट्य अभिनय, देहबोली अभिनय तसेच  ऑडिशन्सला जाण्यापूर्वीची युवा कलाकारांची तयारी यावर मार्गदर्शन केले. कोल्हापूर, इंचलकरंजीमधील नृत्यदिग्दर्शक कृष्णा खत्री यांनी वेस्टर्न डान्समधील नवीन डान्स प्रकारची माहिती दिली. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जा देणारा एक गुरूवर्य असे एक यशवंत भालकर असल्याचे सांगितले.

नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर यांनी, भविष्यात युवा कलाकारांसाठी चित्रपट विषयक कार्यशाळाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी प्रियंका कुंभार, आकाश लिगाडे, भूषण पाठक, करण गायकवाड, रसिका भालकर तसेच भालकर्स कला अकादमीची ओल्ड इज गोल्ड बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते.