पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये तेजस्वी यादव की पुन्हा नितीशकुमार यांची सत्ता येणार ? हे आज स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या निकालानुसार अटीतटीची लढत होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी आघाडी  घेतली होती. परंतु आता एनडीएने १२४ जागांवर  आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११० जागांवर आघाडी घेतली आहे.

 

त्यामुळे नितीशकुमार सत्ता कायम राखणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता आलेल्या निकालानुसार आरजेडी ६८, भाजप ६३, जेडीयू ५७ काँग्रेस २४ एलजेपी ३ जागांवर आघाडी आहे. मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी २३७ जागांचे कल हाती आले आहेत.