नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचा आज (सोमवार) १३६ वा स्थापना दिन देशात विविध कार्यक्रमांनी साजरा होत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून त्यांच्यावर भाजपने टीका केली आहे. या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या आजीची प्रकृती चिंताजनक असल्याने ते परदेशात गेले आहेत, असे सातव यांनी सांगितले.

सातव यांनी म्हटले आहे की, आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो. त्याप्रमाणे राहुल गांधी परदेशात गेले आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत होऊ लागली आहे. नोकऱ्या गेल्याने लाखो लोक अडचणीत आले आहेत. याबद्दल   मोदी एकही शब्द काढायला तयार नाहीत, असा पलटवार सातव यांनी भाजपवर केला.