भारतात लस कधी मिळणार..? अदर पुनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

0
60

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाची लक्ष कधी येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असताना  सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्हाला आपातकालीन वापरासाठीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे.  त्यानंतर जानेवारी महिन्यांपासून लसीकरणाला सुरूवात होऊ शकते, असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.

इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये माहिती देताना  पुनावाला यांनी सांगितले की,  या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्हाला आपातकालीन वापरासाठीचा परवाना मिळू शकतो. पण, व्यापक स्वरूपात लसीचा वापर करण्याचा मूळ परवाना नंतर मिळण्याची शक्यता आहे. जर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होऊ शकते.  त्याचबरोबर ऑक्टोबरपर्यंत देशातील जनजीवन पूर्वपदावर येईल, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.  भारतामध्ये २० टक्के लस मिळाली की,  आपल्यामध्ये आत्मविश्वास व भावना पुन्हा परत येतील.   पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकासाठी पुरेशी लस उपलब्ध होऊन  जनजीवन पूर्वपदावर येईल, असे पुनावाला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here