करवीर मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावू : राहुल पाटील   

0
70

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. जिल्ह्याचे नेते व आमदार पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातून १३ लाख ७५ हजार रूपये मंजूर झालेल्या रस्ते कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सत्यजित पाटील होते.

करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, आ. पी.एन. पाटील यांनी  ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रत्येक गावात निधी दिल्याने विकासकामांना चालना मिळत आहे.

सरपंच व गोकुळ दूध संघाचे संचालक सत्यजीत पाटील म्हणाले की, आ. पी.एन पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली जाती.

यावेळी आत्माराम पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, भगवान सूर्यवंशी, मुकुंद पाटील, दिनकर सूर्यवंशी, सर्जेराव तिबिले, दिनकर गावडे, श्रीनिवास पाटील, संदीप सुतार, ग्रामसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here