शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत : चंद्रकात पाटील

0
110

पुणे (प्रतिनिधी) : निवडणुकीआधी जनतेला आश्वासन द्यायचे, आणि निवडणुकीनंतर ते विसरून जायचे, अशी शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेला लगावला. पुण्यातील एका विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कामाबाबत भाजप नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

पाटील म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करण्याची तयारी ठेवावी. जनतेला दिलेल्या आश्वासनाची यादी प्रत्येक नगरसेवकांनी आपल्यासोबत ठेवावी. आपली कोणती कामे राहिली आणि केली याची नोंद यामध्ये असायला हवी. ही यादी भिंतीवर चिटकवा. जेणेकरून येता जाता दिसेल आणि लवकरात लवकर कामे होतील, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सर्व कामे करण्याचा प्रयत्न करा. काही कामे राहून जातात. मात्र, ती पुढील निवडणुकीवेळी पूर्ण करायची असतात. नाहीतर शिवसेनेसारखे करु नका. निवडणुकीआधी आश्वासन द्यायचे आणि पुन्हा विसरून जायचे, असे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here