साळवण (प्रतिनिधी) : स्वर्गीय बापू पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तिसंगी या सेवाभावी संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी कोरोनावर मात करण्यासाठी गगनबावडा तालुक्यात विविध कार्यक्रम राबविले. यामध्ये स्वत:सह चार जीव धोक्यात घालून कोरोना काळात घरोघरी सेवा देणाऱ्या दोन गटप्रवर्तक व ४३  आशा स्वयंसेविका  या एकूण ४५ जणांना मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, औषधे व अन्य साहित्य वाटप करण्यात आले.

निवडे व गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना किट वाटप करण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी लोकांना औषधे वाटप करण्यात आली. या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी जनतेची काळजी घेणाऱ्या तालुक्यातील कोरोणा यौध्यांचा सत्कार करण्यात आला. ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती रथ काढण्यात आला. तालुक्यातील गावागावांत या रथाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भगवान पाटील, गगनबावडा तालूक्याचे गटविकास अधिकारी  शरद भोसले, निवडे सरपंच  दगडू भोसले,  बांधकाम अभियंता बाजीराव मिसाळ,  संभाजी पाटील,  विनायक तेली, संग्राम देशमाने, प्रकाश मोरे, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील, गटसमन्वयक  रघुनाथ चौगले, ग्रामसेवक  श्रीधर खुटाले, भिवाजी बचाटे, सुभाष भोसले, बाजीराव देसाई, शहाजी माने, सतिश पानारी, रोजगार सेवक पांडुरंग कोलते, आशा वेकर्स सुरेखा तिसंगिकर, माया कांबळे, माधवी बोडके, उज्वला पाटील  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.