नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी शिवसेनेतर्फे सत्कार : राजेश क्षीरसागर

0
162

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे शुक्रवार (दि.८) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने त्यांचा भव्य सत्कार होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना क्षेत्राकरिता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली राज्यभर लागू केली आहे. कोल्हापूर शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे सायंकाळी ७ वाजता चांदीची तलवार, भगवा फेटा, शाल आणि श्रीफळ देवून ना. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या दौऱ्यादरम्यान ना. शिंदे नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)च्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here