पंचगंगा नदीत आढळला अनोळखी मृतदेह ; घातपाताची शक्यता

0
161

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा नदीवरील दशपिंड घाटाजवळ आज (बुधवारी) सकाळी एक अज्ञात मृतदेह आढळून आला. खून करून मृतदेह पाण्यात टाकल्याने घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी पंचगंगा नदीवरील दशपिंड घाटाजवळ काही नागरिक फिरण्यासाठी गेले होते. या नागरिकांना नदीमध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती करवीर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, या मृत व्यक्तीच्या शर्टला मासेमारी करणाऱ्या गळाची दोरी असून ही दोरी काठावरील दगडाला बांधली आहे. मृतदेह उलटा होतो, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.   पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here