संतापजनक : तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या

0
181

अलिबाग  (प्रतिनिधी) : पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेवर  अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी आदेश मधुकर पाटील  या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मळेघरवाडी या आदिवासी वाडीत आरोपी चिमुरडी राहत असलेल्या झोपडीत गेला. या आदिवासी कुटुंबीयांच्या झोपडीला दार नसल्याचा फायदा घेऊन त्याने घरात झोपलेल्या मुलीला  बाहेर उचलून  नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.  नंतर तीची हत्या करून मृतदेह आदिवासी वाडीवर आणून टाकला. याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here