कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील एकाच कुटूंबातील दोन सख्खे भाऊ आणि आई अशा तिघांचा आज (शनिवार) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कुटूंबाचा कळे गावात ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. या कुटुंबाकडून परिसरातील अनेक गरजूंना सहकार्य केले जात होते. कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
यड्रावचा इसम पंचगंगेत बुडाला…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे पंचगंगा नदीमध्ये पोहत असताना एक मध्यमवयीन इसम बुडाला. रवींद्र पांडुरंग शिंदे (वय ४८, रा. राजीव गांधीनगर, यड्राव) असे त्याचे इसमाचे नाव आहे. हा प्रकार आज (शुक्रवारी) सकाळी घडला.
शिंदे हे...
करवीरच्या पोलीस उपअधीक्षकपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर उपविभागाच्या नूतन उपअधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव उर्फ आर. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांचे पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी...
प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार : वीरपत्नी वृषाली तोरस्करांचा इशारा (व्हिडिओ)
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पती शहीद होऊन सुद्धा त्यांच्या नावे दिलेला प्लॉट मिळण्यासाठी १४ वर्षे संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीरोजी सकाळी १० वाजता आत्मदहन करणार असल्याचा इशारा वीर पत्नी वृषाली...
संभापूरच्या उपसरपंचपदी ज्योती भोसले बिनविरोध
टोप (प्रतिनिधी) : संभापूर (ता. हातकणंगले) उपसरपंचपदी ज्योती तानाजी भोसले यांची बिनविरोध निवड झाली. संभापूर ग्रामपंचायतीवर जय गणेश पॅनेलची सत्ता असून पॅनेलचे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य आहेत. गटांतर्गत समझोत्यानुसार सर्जेराव मोहिते यांनी उपसरपंच पदाचा...
भजनसम्राट नरेंद्र चंचल काळाच्या पडद्याआड…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विशिष्ट गायनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले भजनसम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (शुक्रवार)...