कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील ‘राजापूर’मध्ये यंदा प्रथमच निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये ९५ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजताच मतदान जवळपास पूर्ण झाले असल्याचे माजी सरपंच शिवाजी मांजरे यांनी म्हटले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाले असून काही मतदार मृत झाले आहेत. तर, परगावी असलेले ४ मतदार सुद्धा गावात येऊन मतदान करणार आहेत.

ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने निवडणूक बिनविरोध होत आली आहे. मात्र पहिल्यांदाच ४ जागांसाठी गावात निवडणूक लागली आहे. सकाळपासून मतदारांनी मतदानकेंद्रावर गर्दी केली आणि केवळ साडेतीन तासांत गावातले सर्व मतदान पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.