सेक्स पोझिशन बदलण्याचा अचाट डाव तरूणाच्या अंगलट

0
156

नागपूर (प्रतिनिधी) : पॉर्न फिल्म पाहून सेक्स करण्याची विकृती नागपूरमधील एका तरुण इंजिनिअरच्या जीवावर बेतली आहे. त्याने केलेल्या अचाट पराक्रमामुळे गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. लॉजवर हा प्रकार घडल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.

मृत्यूमुखी पडलेला तरूण २७ वर्षीय असून तो पेशाने इंजिनिअर होता. त्याचे एका २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यामुळे प्रेमाचा आनंद घेण्यासाठी ते  फिरण्यासाठी गेले होते. फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील रुम बुक केली होती. लॉजवर दोघांमध्ये शरीरसंबंध आले.

मात्र, शरीरसंबंध ठेवताना त्या इंजिनिअरने पोर्न व्हिडिओ पाहिले होते. त्याने एका पोझिशनमध्ये त्या दोघांनी दोरीचाही उपयोग केला. वापर केलेल्या दोरीने त्या तरुणाला खूर्चीला बांधण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांनी दोन्ही पाय आणि गळासुद्धा दोरीने बांधला होता. या स्थितीमध्ये त्यांनी शरीरसंबंध ठेवले. शरीरसंबंध झाल्यानंतर तरुणी बाथरुममध्ये गेली. त्याच कालावधीमध्ये संबंधित तरुण खूर्चीवरून खाली पडला. त्यामुळे गळ्याभोवती असलेल्या दोरीने त्याला फास लागला आणि इंजिनिअरचा मृत्यू झाला. तरुणीने बाथरुममधून बाहेर आल्यानंतर तरुण मृत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भेदरलेल्या तरुणीने झाल्या प्रकाराची माहिती लॉज व्यवस्थापनाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here