कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आणखी २३ रुग्णांची भर पडली आहे. आज (शनिवार) दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १५, आजरा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण  – ५०,३९३.

डिस्चार्ज – ४८,३९५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – २५५.

मृत्यू – १७४३.