शेंडापार्कातील कृषी विद्यापीठाच्या जागेतील गवत, रोपे जळून खाक…

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाच्या जागेमध्ये असणाऱ्या गवत आणि झाडांच्या रोपांना आज (सोमवार) सकाळी अचानक आग लागली. यामध्ये सुमारे २५ एकरातील गवत आणि दहा हजारांहून रोपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी अग्निशमन दलाचे तीन बंब आणि एका पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाच्या २५ जागेतील गवत आणि रोपांना आज अचानक आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी जयवंत खोत, नवनाथ साबळे, सुदेश पाटील, रवींद्र ठोबरे, आकाश जाधव, रमजान पटेल,बाबुराव सनगर, श्रीधर चाचे, अमोल पाटील, रमेश जाधव, राजेंद्र भोसले व अजित मळेकर यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाचे तीन बंब आणि महानगरपालिकेचा एक टँकर यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here