आयुक्तांनी ठोठावला बेकरी, मिसळसेंटरमध्ये 2 हजारांचा दंड

0
28

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो मास्क-नो एंन्ट्री यानुसार आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज स्वत: बुधवार पेठेतील दोन बेकरी व्यावसायिकांवर मास्क न घातल्याबद्दल प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड तर दसरा चौकातील एका मिसळ सेंटरमध्ये विनामास्क बसलेल्या पाच तरुणांवर 1 हजार रुपयांच्या  दंडाची कार्यवाही केली.

आज स्वच्छता अभियानाच्यानिमित्ताने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी पंचगंगा घाट येथे गेले होते. परत येतेवेळी त्यांना बुधवार पेठेतील न्यू अशोक बेकरी तसेच अर्जुन बेकरीमध्ये बेकरीमालक विनामास्क असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी महापालिकेच्या पथकास पाचारण करुन संबंधितांवर दंडाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने बुधवार पेठेतील न्यू अशोक बेकरी तसेच अर्जुन बेकरीस प्रत्येकी पाचशे रुपयांच्या दंडाची कार्यवाही केली.

तसेच पुढे दसरा चौकात आल्यानंतर त्यांना शिव मिसळ सेंटर येथे 10 तरुण बसले होते, त्यापैकी 5 तरुण विनामास्क बसल्याचे आढळून आले. या पाच तरुणांवर 1 हजार दंडाची कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here