शासकीय सुटीदिवशी सुरू राहणार जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागेवर इच्छिणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी २५, २६२७ डिसेंबर या शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ग्रामपंचायत निवडणूक विषयक अर्ज स्वीकरण्यासाठी कार्यालय चालू राहील, अशी माहिती संशोधन अधिकारी तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here