नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅपल आज iPhone १२ सिरीज लाँच करण्याची  शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणणार आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार असून याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार आहे. हा इव्हेंट अॅपलची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

एका रिपोर्टनुसार कंपनी चार मॉडेल लाँच करू शकते. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max आणि iPhone 12 mini असू शकतात. हे चारही मॉडेल ५ जी सपोर्ट करणारे असतील. नवीन आयफोनशिवाय कंपनी नवीन HomePod mini किंवा ओव्हर द इयर हेडफोन लाँच करू शकते.

iPhone 12 च्या अंदाजे किमतीही चर्चेत आहेत. आयफोन १२ मिनी यामध्ये सर्वात स्वस्त असेल. याची किंमत ६९९ डॉलर (५१,२०० रुपये) असू शकते. तर आयफोन १२ ची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर (५८, ६०० रुपये), आयफोन १२ प्रोची सुरुवातीची किंमत ९९९ डॉलर (७३,२०० रुपये) आणि आयफोन १२ मॅक्स प्रोची किंमत १०९९ डॉलर (८०, ६०० रुपये) असण्याची शक्यता आहे.

डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स – : आयफोन मिनीमध्ये 5.4 इंच डिस्प्ले, १२ आणि १२ प्रोमध्ये ६.१ इंच डिस्प्ले, १२ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या सिरीजचे डिस्प्ले OLED सुपर रेटिना XDR असण्याची शक्यता आहे. यावर सुरक्षेसाठी सिरॅमिक शील्ड ग्लास असणार आहे.

नवीन मॉडेल्सनुसार ए १४ बायोनिक चिपसेट आणि १५ वॉट वायरलेस चार्जिंग मिळू शकते. याला कंपनी MagSafe नाव देऊ शकते. आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ मध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा असून शकते. तर अन्य दोन फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल.

फीचर्स : स्टोरेज – 64 GB, कॅमरा – 12MP + 12MP + 12MP, बॅटरी – 3210 mAh, डिस्प्ले – 6.1″ (15.49 cm)

रॅम – 6 GB