कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना आरोग्य विभागासह सर्व संबधित विभागांनी परस्पर समन्वय ठेऊन स्वच्छ सर्वेक्षणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवविण्याची सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.

केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या वेबीनारमध्ये महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या वेबीनारच्या अनुषंगाने यापुढील काळात करायाच्या उपाययोजनांबाबत महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसोबच व्हीसीव्दारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी महापालिकेचे सर्व नोडल ऑफिसर, मुख्य आरोग्य निरिक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आयईसी टिमही सहभागी झाल्या होत्या.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेतले असून ते अधिक दर्जेदारपणे आणि गतीने राबविण्यावर सर्वांनी भर द्यावा, अशी सूचना करुन  आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की,   स्वच्छ सर्वेक्षण २०२१ बाबत झालेल्या बेबीनारमधील सर्व बाबी आणि सूचनानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वच यंत्रणांनी सक्रीय व्हावे,कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबतही सुरु असलेल्या उपायोजनांची माहिती तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांनीच्या नियोजनावरही यावेही चर्चा करण्यात आली. तसेच सार्वजनिक शौचालय, सामुदायिक शौचालये आणि मुतारी स्वच्छता, सार्वजनिक सेप्टीक टँकचा मैला उपसाचे वेळापत्रक तयार करुन त्यानुसार कार्यवाही करण्यावरही भर देण्याची सूचनाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.